मुख्याध्यापकाचा संदेश

Abhinav Adarsh   School

प्रिय पालक,

सदर Website सादर करतांना मला अतिशय आनंद होत आहे. यामुळे शाळा, पालक संस्था यांच्यात जवळीक निर्माण होणार आहे व समन्वय साधला जाईल.

समाजाला शिक्षण देण्याच्या प्रमुख उद्देशाने शाळा ह्या औपचारिक संस्थेची निर्मिती झालेली असते.

अभिनव आदर्श या नावाप्रमाणे आदर्श शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या योगदानातुन शाळेमध्ये वर्षभर विविध उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात या उपक्रमांचे फलित म्हणून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय बदल दिसून येतो.

आपल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षण देणे हा आमचा संकल्प आहे की ज्यामुळे आपले विद्यार्थी स्वावलंबी नागरीक व उद्याचे शिल्पकार होतील.

शाळेचे प्रतिबिंब आपल्याला समाजात दिसावे या दृष्टीने शाळेचा प्रत्येक व्यक्ती सतत कार्यशील राहतो व भविष्यातही राहील.


सौ. जयश्री ठाकरे(मुख्यध्यापिका)

The Progressive Education Society's | All Rights Reserved.

Designed by : LBM Infotech