अभिनव आदर्श हायस्कूल

Abhinav Adarsh   School

अभिनव आदर्श मराठी शाळा ही मराठी माध्यमाची शाळा जेलरोड येथे १९९५ पासून गोदावरी सोसायटीत सुरु करण्यात आली विदयार्थ्याचा वाढता ओघ लक्षात घेऊन सायखेडा रोड नारायण बापू नगर येथे एक एकर जागा घेऊन सन १९९५-१९९६ मध्ये बालवाडी ते इ. ४ थी चे वर्ग पत्र्याच्या शेड मध्ये सुरु झाले व पुढे २००१ मध्ये नवीन इमारतीत बालवाडी ते इ. १० पर्यंतचे सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाचे वर्ग सुरु आहेत.

शाळेत पुर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक मिळून १३०० (एक हजार तीनशे) च्या वर विदयार्थी शिक्षण घेत आहे. स्वच्छ सुंदर प्रसन्न वातावरणात विदयार्थ्यांवर संस्कार घडविणारी व जिव्हाळा जपणारी, सामाजिक बांधिलकी ठेवणारी शाळा म्हणून अल्पावधीत नावारूपाला आली.

शाळेत स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र संगणक वर्ग, सभागृह, वाचनालय, चित्रकला वर्ग, अद्यावत व्यायाम शाळा असून स्मार्ट बोर्डचा ही अध्ययन अध्यापनासाठी वापर केला जातो. शिक्षकांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा व नवनवीन शैक्षणिक कौशल्य विकसित व्हावे म्हणून शिक्षकांना नियमित प्रशिक्षण दिले जाते.

सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात इ. १० वी ची पहिली बॅच बाहेर पडली त्यावेळी १० वी चा निकाल १००% लागला. बौद्धीक विकासाबरोबरच सामाजिक, भावनिक, शारीरिक विकास व्हावा म्हणून वर्षभर विविध स्पर्धाचे व उपक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नाटयवाचन, भावगीत, सुंदर हस्ताक्षर, रांगोळी, मेहंदी अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात व विदयार्थ्यांचे बक्षिस देऊन कौतुक केले जाते.

शालेय स्पर्धात्मक परीक्षा ही घेतल्या जातात शिष्यवृत्ती, आय.टी.एस., हिंदी राष्ट्रभाषा, जी.के. ऑलंम्पियाड, ज्ञानपीठ परीक्षा घेऊन विदयार्थ्यानी राज्यात व विभागात येण्याचा मान मिळवला सन २०१९-२० पासून विदयार्थी इंग्रजी विषयात मागे राहू नये म्हणून Functional English Course इयत्ता ३ री पासून सुरु करण्यात आला.

अशा प्रकारे शाळेचा आलेख उंचउंच यशोशिखरावर पोहचत असतानाच सन २०२०-२१ मध्ये रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहोत.

Our Vision

मुख्याध्यापकाचा संदेश

प्रिय पालक,

"नाचा, बागडा हसा खेळा,"

"शाळेत जमला विदयार्थ्यांच्या मेळा"

प्रत्येक मूल आपले घर, आपला परीसर सोडून शाळेत येतो व त्यांच्या मन:पटलावर शाळेद्वारे विविध संस्कार होत असतात व त्यातुन विदयार्थ्यांचे व्यक्तीमत्व खुलत जाते. जसे एका हिऱ्याला विविध पैलू पाडून त्याचे महत्व अमूल्य ठरविले जाते तसेच विदयार्थ्यांच्या व्यक्तीमत्वचे विविध पैलू लक्षात घेऊन उत्तम भविष्य घडविण्याचे काम शाळा करत असते.

शाळा ही विदयेचे मंदिर, तर संस्कारांचे माहेर घर आहे. विदयार्थी हे विदयालयाचे केंद्र बिंदू मानून त्यांचा सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेऊन संस्था, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक सतत प्रयत्नशील आहेत.

Read More
abhinav Headmaster

मुख्याध्यापकाचा संदेश

प्रिय पालक,

सदर Website सादर करतांना मला अतिशय आनंद होत आहे. यामुळे शाळा, पालक संस्था यांच्यात जवळीक निर्माण होणार आहे व समन्वय साधला जाईल.

समाजाला शिक्षण देण्याच्या प्रमुख उद्देशाने शाळा ह्या औपचारिक संस्थेची निर्मिती झालेली असते.

अभिनव आदर्श या नावाप्रमाणे आदर्श शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या योगदानातुन शाळेमध्ये वर्षभर विविध उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात या उपक्रमांचे फलित म्हणून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय बदल दिसून येतो.

Read More

The Progressive Education Society's | All Rights Reserved.

Designed by : LBM Infotech